विश्वास
सभासदांच्या प्रत्येक रुपयाची जबाबदारीने काळजी.
रेणुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था गेली ४० वर्षे नातेपुते येथे कार्यरत आहे. संस्थेची स्थापना १४ जानेवारी १९८६ रोजी समाजभूषण मुधोजीराव भोजराव तथा नानासाहेब देशमुख यांनी केली.
सर्वसामान्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावणे हे संस्थेचे ध्येय आहे. त्यासाठी लहान व्यापारी, हातगाडीवाले, हॉटेल व्यावसायिक, शेतीला जोडधंदा म्हणून म्हशी व संकरित गायी घेऊन दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, प्रिंटिंग प्रेस अशा अनेक व्यवसायांसाठी संस्थेने कर्जपुरवठा केला आहे.
लहानशा सुरुवातीपासून आज कोट्यवधींच्या ठेवी व कर्जव्यवहारांपर्यंत झालेली वाटचाल सभासदांच्या विश्वासामुळे आणि पारदर्शक कारभारामुळे शक्य झाली आहे.
| तपशील | १९८६-८७ | २०२५-२०२६ |
|---|---|---|
| सभासद | ५०९ | १,१८३ |
| भागभांडवल | ₹४९,९५५ | ₹२,६३,४०,३५९ |
| निधी | ₹५०९ | ₹९,०३,४८,६६४ |
| ठेवी | ₹३,००,५३१ | ₹५७,७३,१२,५३९ |
| कर्जे | ₹३,९७,४५७ | ₹४५,८९,९३,८८३ |
| गुंतवणूक | ₹६६,००० | ₹२४,६२,१३,०४९ |
| खेळते भांडवल | ₹३,६१,०५० | ₹७५,२२,३५,२८९ |
| निव्वळ नफा | ₹४,८९२ | ₹४५,२१,१२३ |
| लेखापरीक्षण वर्ग | — | अ |
सभासदांच्या प्रत्येक रुपयाची जबाबदारीने काळजी.
स्पष्ट नियम, स्पष्ट व्याजदर आणि नियमित लेखापरीक्षण.
आपुलकीची, जलद आणि आपल्या भाषेतील सेवा.
आमच्या मुख्य शाखेला भेट द्या किंवा फोन करा. आमचे कर्मचारी आपल्याला आनंदाने मार्गदर्शन करतील.